HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतदानाला सुरुवात, जाणून घ्या सकाळपासून किती टक्के झाले मतदान…

पुणे | राज्यातील विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी आज (१ डिसेंबर) मतदान सुरु आहे. अनेक नेत्यांनीही आफला मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, सकाळी १० वाजेपर्यंत किती टक्के झाले मतदान?

कोल्हापूर –

पदवीधर -११.७५%

शिक्षक – १८.२२ %

पुणे –

पदवीधर -१०%

अमरावती –

शिक्षक – १०.११%चंद्रपूर :

पदवीधर – ७.७७ %

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील स्थितीबाबत पवारांना चिंता, सरकार लवकर स्थापन व्हावे !

News Desk

दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाही – अजित पवार

News Desk

भिडे गुरूंजींचे अजब वक्तव्य

News Desk