पुणे | चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन माध्यमातून महोत्सव पोहोचणार रसिकांपर्यंत पूणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ यावर्षी येत्या ४ ते ११ मार्च, २०२१ दरम्यान होणार आहे. महोत्सवाचे हे सलग १९ वे वर्ष असून चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षी महोत्सव सिनेरसिकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला व दरवर्षी चित्रपट रसिक ज्याची आतूुरतेने वाट पहात असतात अशा या महोत्सवासाठी यावर्षी ९३ देशांमधून तब्बल १६११ चित्रपट प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी विविध विभागातील तब्बल १८० चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना महोत्सवा दरम्यान घेता येणार आहे. चित्रपट निवड समितीच्या माध्यमातून या चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.