HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा बांलणीवर

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे लांबणीवर गेला आहे. ठाकरे हे २४ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, ठाकरेंच्या अयोध्या दौरा लांबणीवर गेला असून दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक अयोध्या प्रकरणावर निर्णय दिल्यानंतर पुन्हा एकदा दौरा करणार होते.

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. हा दौरा २४ नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत असल्याने हा दौरा लांबणीवर पडला आहे.

सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप सरकार स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. मुख्यमंत्री पदावरून शिसवेना-भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. मात्र, राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देण्याबाबात अद्याप निर्णय घेऊ शकलेला नाही. यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास थोडा विलंब होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय’, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक!

News Desk

हसन मुश्रीफ म्हणतात, फडणवीस ड्रायक्लिनर आहेत हे खडसेंचं वाक्य मला पटलं !

News Desk

‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर कायदा मांडणार

swarit