HW News Marathi
Covid-19

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत महाराष्ट्रातील ‘हे’ शहर पहिल्या स्थानी 

पुणे | जगात आणि संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. संक्रमित देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सुरुवातीला मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते आणि आता पुणे हे देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचे शहर बनले आहे. आतापर्यंत पुणे शहरात सुमारे १ लाख ८२ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील ३ शहरांचा समावेश आहे.

पुण्याशिवाय या यादीत दुसर्‍या क्रमांकावर मुंबई आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १.४८ लाखांवर गेली आहे. यानंतर चेन्नईचा क्रमांक लागतो.चेन्नईत १.३७ लाख रुग्ण आढळले आहेत. चौथ्या स्थानावर ठाणे शहराचा १.३५ लाख रुग्ण आहेत. यानंतर पाचव्या क्रमांकावर बंगळुरु शहर जिथे १.३२ लाख रुग्ण आहेत.

सुरुवातीला जेव्हा भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला त्याची सुरुवात पुण्यातूनच झाली.पुण्यात पहिले २ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. नंतर कोरोनाचा फैलाव सुरू होताच मुंबईलाही त्याचा विळखा वाढत गेला. मुंबईत मे, जून, जुलै व ऑगस्टमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले. याचवेळी पुण्यात जुलै महिन्यातच इतके रुग्ण वाढले की संपूर्ण परिस्थितीच हाताबाहेर गेली. १४ ते २७ जुलै या काळआत देशात ५ लाख ७४ हजार ८५८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातील ३७,९५० रुग्ण एकट्या पुणे शहरातील होते. पुणे जिल्ह्यात जेवढी कोरोना रुग्णांची नोंद झाली त्यात सर्वात जास्त रुग्ण पुणे शहर व पिंपरी-चिंचवड येथे वाढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार अन् अजित पवारांची भेट

News Desk

पुण्यातून बाहेर पडायचे आहे ? वाचा ही प्रेस नोट

News Desk

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणतात, मलाही अटक करा!

News Desk