HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे-कोल्हापूर बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका

पुणे स्वारगेट ते कोल्हापूर एसटी चालकाला चालू गाडीत ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे एसटीचा अपघात झाला यात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत . ही घटना पुणे बंगळूर महामार्गावर खंडाळा जवळ घडली आहे. एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

 

पुणे स्वारगेटवरून कोल्हापूर निघालेली एसटी (एमएच १४ बीटी ४७८५) ही खंडाळा तालुक्यातील पारगाव गावच्या हद्दीत आली यावेळी चालक भारत तुळशीदास होवाळ (रा. हातकणंगले) यांना झटका आला. त्यावेळी त्याचा एसटीवरचा ताबा सुटला आणि समोरच्या एका गॅस टॅंकरला घासत पुढे जात होती. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला प्रवाशी रमोश वाळवे उठून गाडीचा ब्रेक दाबला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कायद्याची एजंट; कायद्यानेच काम करते : किरण बेदी

News Desk

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार, मंत्रिमंडळात घेतला निर्णय

Aprna

आषाढी एकादशींनिमित्ताने पंतप्रधान मोदी, बिग बींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा

News Desk