HW News Marathi
Covid-19

पुण्यातील ग्रामीण भागातील दारुची दुकाने सुरु होणार

पुणे | संपूर्ण देशात तिसरा लॉकडाऊन जरी असला तरी दारुची दुकाने सुरु करम्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामूळे आज (४ मे) सकाळपासूनच सर्व दारुच्या दुकानांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. पुण्यातही ग्रामीण भागातील सर्व दुकाने सुरु करण्यात यावी असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर कदम यांनी दिले आहेत. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील कंटेंन्टमेंट झोन, मॉल्स, बाजारतील दुकाने यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

दरम्यान, दारुच्या रांगेत उभे राहतानाही अनेक अटी या लागू करण्यात आल्या आहेत. रांगेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करमे गरजेचे आहे. एकावेळी दुकानांसमोर ५ जणांपेक्षा जास्त लोकांनी उभे राहण्यास बंदी आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप अशी ल७मे आढळल्यास त्यांना दुकामात प्रवेश करता येणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळला आता तिसरी आणि चौथी लाटही येणार!

News Desk

देशातील ‘या’ राज्याने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन    

News Desk

“मागेल त्याला ‘वॅक्सिन’ द्या!”, अशोक चव्हाणांची मागणी

News Desk