HW News Marathi
Covid-19

पुण्याचे महापौर आक्रमक ! राष्ट्रवादीच्या शहरअध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कालच्या (१९जून) उदघाटनप्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाल. तर या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाच्या वेळी सर्व नियमांना धाब्यावर बसवत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ आता चांगलेच संतापले आहेत.

तर या उदघाटन आयोजनाचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केल होते. म्हणून आता प्रशांत जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोहोळ यांनी केली आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित अजित पवारांना चूक लक्षात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत गर्दी पाहून गाडीतूनच परत जाणार होतो असं म्हणालेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यानिमित्तानं प्रत्येकालाच नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतात तर एकीकडे त्यांच्या कार्यक्रमातच नियमांचं पालन होत नसल्याने विरोधकांनी यामाहाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली. तरी या सर्व घटनेत पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने आता या प्रकरणात नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लसीकरण केंद्रावर खासदार राजन विचारेंकडून कार्यकर्त्याला मारहाण’

News Desk

HW Exclusive | विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

News Desk

आज कोरोनाचे १०२६ नवीन रुग्ण, राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण

News Desk