HW News Marathi
Covid-19

पुण्याच्या महापौरांनी हॉटस्पॉट परिसराचा घेतला आढावा

पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज (२ मे) हॉटस्पॉट परिसराचा सर्व यंत्रणांसह आढावा घेतला.कोरोना हॉटस्पॉट परिसरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच पाटील इस्टेट झोपडपट्टी, कामगार पुतळा झोपडपट्टी, ताडीवाला रोड झोपडपट्टी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी येरवडा भागात महापालिका, पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आज पाहणी करून आढावा घेण्यात आला.

 

तसेच, पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशा हॉटस्पॉट परिसरातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी हा परिसर पोलिसांनी पूर्णपणे सील केला आहे. नागरिकांच्या समस्या, सोशल डिस्टनसिंगची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध उपाययोजना यावर प्रत्यक्ष पाहणी करुन चर्चाही करण्यात आली.

 

पुणे जिल्हयात 1 हजार 876 बाधीत रुग्ण असून 101 रुग्णांचा मृत्यू झाला, सातारा जिल्हयात 54 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सोलापूर जिल्हयात 111 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला, सांगली जिल्हयात 32 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा एकूण रुग्णांचा आकडा ४,४१,२२८ वर पोहोचला

News Desk

राज्यात आज कोरोनाचे १६०२ नवे रुग्ण, बाधितांचा आकडा २७५२४ वर

News Desk

राज्यात पुन्हा एकदा १४ हजारांच्या पुढे बाधितांचा आकडा 

News Desk