पुणे | पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, काल अजित पवार सोबत यांची बैठक झाली आणि चार-पाच दिवसांपूर्वी शरद पवारांसोबत देखील त्यांची बैठक झाली होती
थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे त्यांनी ट्विट केले आहे.
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.