HW News Marathi
Covid-19

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण जाहीर, थेट केंद्रावर येणाऱ्यांना देणार लस

मुंबई | कोरोना लसीकरण सुरळीत होण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसारच पुढील आठवड्यात मुंबईत कोणत्या दिवशी कुणाला लस घेता येणार याबाबत मुंबई महानगरपालिकेने सविस्तर वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार 24 ते 26 मे 2021 दरम्यान 3 दिवस कोरोना लसीकरणासाठी स्लॉट बुकिंगची गरज असणार नाहीये. लसीकरण केंद्रावर थेट येणाऱ्यांचं वॉक इन लसीकरण होणार आहे. यानंतर 27 ते 29 मे 2021 या 3 दिवशी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण होणार आहे. तसेच रविवारी म्हणजे ३० मे रोजी लसीकरण बंद असणार आहे.

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी आणि लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात त्यांनी कुणाला कशी लस घेता येणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

24 ते 26 मे 2021 दरम्यान लसीकरणासाठी थेट येण्याची मुभा कुणाला?

  1. 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी
  2. 60 वर्ष 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी
  3. आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
  4. 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
  5. कोव्हॅसीन लसीचा विचार करता सर्व वयोगटातील दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येऊ शकतील.
  6. 27 ते 29 मे 2021 या 3 दिवसात प्रत्येक केंद्रावर 100 टक्के लसीकरण कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर आणि लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.
  7. रविवारी 30 मे 2021 रोजी लसीकरण कार्यक्रम बंद राहील

    बीएमसीचं मुंबईकरांना आवाहन

आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना 1 दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

कोविड –19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या नियोजनाची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन बीएमसीने केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल कोल्हेंनी रेमेडेसिविर मिळत नसल्यास सांगितली पर्यायी औषधाची नावे!

News Desk

मुंबईची चिंता वाढली! आज तब्बल ६ हजार ३४७ नवे कोरोना रुग्ण

Aprna

महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय आता पर्याय उरला नाही,सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत!

News Desk