HW News Marathi
महाराष्ट्र

अंदुरेच्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या | सीबीआय

पुणे | डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा संबंध ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाशी असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे आता सीबीआयने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा सीबीआयकडून केला गेला आहे.

अंदुरेला 30 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अंदुरेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने हा धक्कादायक खुलासा केला

डॉ. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांत सचिन अंदुरे याचा समावेश असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच विरेंद्रसिंह तावडेसोबत मिळून सचिन अंदुरेने या हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे संपर्क फॉर समर्थन सर्वात घाणेरडा कार्यक्रम | संजय निरुपम

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी शासनाकडून एसटीसाठी १००० कोटींचे पॅकेज जाहीर

News Desk

सत्तेबाहेर असतानाही बाळासाहेब ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला!

News Desk