HW News Marathi
महाराष्ट्र

सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, मुलींची सुटका

पुणे | पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढव्यातील रहिवासी संकुलात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली तर एका इसमाला ताब्यात घेतले.

सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय पांडुरग सूर्यवंशी (वय ३८) असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या व्यक्ती नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तर या घटनेत दोन मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. त्या दोन्ही मुलींना महंमदवाडी येथील रेस्क्यु होममध्ये ठेवण्यात आले आहे.

धनंजय सूर्यवंशी हा कोंढव्यातील जरांडे नगर मध्ये असलेल्या हेवन पार्क या इमारतीत वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने छापा टाकात ही कारवाई केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं!

News Desk

साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर!

News Desk

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली

News Desk