HW News Marathi
महाराष्ट्र

‘येवले अमृततुल्य’ चहावाल्यांची काहानी

पुणे | चहा म्हणजे आपल्या सर्वांचे जीव की प्राण म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. कारण सकाळी उठल्यानंतर चहा प्यायल्याशिवाय आपल्या सर्वांचा प्रसन्न वाटत नाही. मग कोणाला घर, ऑफिस किंवा टपरीवरचा चहा आवडतो. चहा प्यायल्यानंतर आपल्या शरीरात एक नवीन उर्जा निर्माण होते. त्यानंतर आपण कामाला सुरुवात करतो.

पण, तुम्हाला माहिती आहे, का? की, चहाविक्रीच्या व्यवसायतून आपल्या दर महिन्यात १२ लाख रुपये मिळू शकतात. चहाविक्रीतून इतके पैसे मिळतील या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पण, हे सत्य आहे. पुण्यातील निलेश येवले आणि त्यांच्या चार भावंडांनी चहाविक्रीचा व्यवसाय सुरु गेला. यांचे दरमहिन्याचे उत्पन्न पाहिले तर तुम्ही थक व्हाल. निलेश येवले यांनी १२वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे.

येवले बंधुनी बघता बघता १० रुपयाची कटिंग विकून दर महिन्याला १२ लाखाचे उत्पन्न मिळवित आहे. पुण्यात ‘येवले अमृततुल्य’ अशा नावाचे टी-हाऊस आहे. येवले यांचा चहा पिण्यासाठी लोक दूरदूरवरुन येतात. ‘येवले चहा एकदा पिऊन तर पहा….’ असे त्यांनी त्यांच्या दुकाना बाहेर लिहिले आहे. या वाक्याला शोभेल अशी त्यांच्या चहाची चव आहे. एखाद्या मोठ्या कंपनीतील सीईओला देखील लाजवेल अशी त्यांची कमाई आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा – छत्रपती संभाजीराजे

News Desk

ग्रामीण भागात 17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी तर शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग होतील सुरू!

News Desk

तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते – सुशीलकुमार शिंदे

News Desk