पुणे | पुण्यातील कोंढवा परिसरातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कार स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (२८ जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
#PuneWallCollapse incident: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announces a compensation of Rs 5 Lakh each to the next of the kin of the deceased. 15 people died in the incident. (file pic) pic.twitter.com/JD1eLfCYIe
— ANI (@ANI) June 29, 2019
तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या २४ तासांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या दुर्घटनेवरून बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?, असा सवाल उपस्थिती करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मृतांना बिहारकडूनही मदत जाहीर
या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत. या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर ते काम करत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले. नितीश कुमारांनी पीडित कुटुबियांना दोन लाखांची अतिरिक्त मदत जाहीर केली. तसेच जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत जाहीर केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.