HW News Marathi
Covid-19

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करावी !

मुंबई | “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी”, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. मंत्रालयातून आज (२७ मे) राज्यातील कापूस खरेदीबाबतचा जिल्हाधिकारी, डिडीआर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा घेऊन संवाद साधला. त्यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या सूचना केल्या आहेत.

“कापूस खरेदीला गती द्यावी.त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात, कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी, सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सोशल डिस्टंसींगचे पालन करावे. इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआयने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने उपलब्ध करुन द्यावेत”, बाळासाहेब पाटील म्हणाले.

“राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी, कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत, त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी”, अशा सूचनाही बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण टाळता आले असते !

News Desk

भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग !

News Desk

#Coronavirus: आज राज्यात १५७६ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk