HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला धक्का, जळगावात ११ नगरसेवक शिवसेनेत!

जळगाव। राज्यातील महापालिकांवर भाजपचाच झेंडा राहणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेत्यांकडून व्यक्त केला जात असतानाच, जळगावात मात्र भाजपला चांगलाच धक्का बसलाय. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील ११ भाजप नगरसेवकांनी शिवबंधन बांधल्याने भाजपला मोठं खिंडार पडल्याचं मानलं जातंय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ११ नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हे सर्व नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक मानले जातात. प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधलं.

गिरीश महाजन यांचा हा सरळ पराभव मानला जातोय

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर अनेक भाजप नगरसेवकांसह पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले होते. मात्र, आता आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागताच खडसे समर्थक नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक सेनेत आणत भाजपला धक्का दिला होता. त्यानंतरचा हा दुसरा धक्का मानला जातो आहे. राज्यभरात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचा हा सरळ पराभव मानला जातोय.दरम्यान, यावेळी हा धक्का भाजपला आहे की एकनाथ खडसे यांना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी धक्का धक्का असतो. तो कुणाला हे तुम्ही ओळखून घ्या, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. तसंच हे नगरसेवक भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यामुळे हा धक्का भाजपलाच असल्याचं मी मानतो, असं पाटील म्हणाले.

मातोश्रीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्व नगसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आले. या वेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड, सोमय्यांवर 150 कोटींचा मुश्रीफ दावा करणार!

News Desk

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये बनावट पनीर कारखान्यावर कारवाई

Manasi Devkar

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा!- सचिन सावंत

News Desk