मुंबई | भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप केले आहेत. “राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. ७० ते ८०कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली”, असा थेट आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकरांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा झाला आहे. खोटी बिलं दाखवण्यात आली. राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. ७० ते ८० कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली. २०१० ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंतची ही बिलं आहेत. दोन ते तीन महिन्यात सर्व नियम धाब्यावर बसवत, सगळी बिलं पास केली. या बिलांचं पेमेंट खोटं आहे. ही बिलं पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी करायला हवी. ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा १५ दिवसांत कोर्टात जाणार”,असे म्हटले आहे.
एकट्या मुंबईतून ७० केटींची बिलं पास झाली. या घोटाळ्याचे तार नांदेडपर्यंत आहेत, असं म्हणत भातखळकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात पैस नव्हते तर मग बिलं पास कशी केली? ही बिल मंत्र्यांच्या बंगल्यांची, मंत्रालयातील कामांची, सरकारी कामांची बिलं. मुळात ही बिलं खोटी आहेत. ३५ टक्के कमिशनने ही बिलं ठाकरे सरकारने पास केली असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1344973381276352514?s=20