HW News Marathi
महाराष्ट्र

आर आर आबांच्या सख्ख्या भावाने मुश्रीफांविरोधात तक्रार स्वीकारली…

कोल्हापूर | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांनी स्वीकारली

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. त्याचीच तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगूड पोलिसात गेले. यावेळी किरीट सोमय्या यांची तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांनी स्वीकारली.महत्त्वाचे म्हणजे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. राष्ट्रवादीचे नेते असलेले हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रार राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्याच्या पोलीस भावाकडे करण्यात आली. यावेळी पोलिस स्थानकात किरीट सोमय्या यांनी आर आर आबांच्या आठवणींना उजाळा दिला.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आतापर्यंत दोन आरोप केले आहेत. यामध्ये पहिला आरोप म्हणजे कागलमधील सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याबाबतचा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता.

 

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयाबद्दल विश्वास नाही म्हणुन पंकजांची निवडणूकीतून माघार ,धनंजय मुंडेंचा टोला!

News Desk

‘दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही’, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही – पाटलांचा सरकारला टोला!

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

Aprna