HW News Marathi
महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावं, अब्दुल सत्तार यांची ऑफर

अहमदनगर | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठी ऑफर दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व आहे. त्यांची राज्याला गरज असून त्यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन करत ही ऑफर सत्तार यांनी दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“राधाकृष्ण विखे पाटील अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. विखे पाटलांनी शिवसेनेत यावं.” असं असलं तरी राधाकृष्ण विखे यांनी मात्र अब्दुल सत्तार आणि आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “अब्दुल सत्तार आणि माझी पक्ष विरहीत मैत्री आहे. अनेक वर्षापासुन ते माझे चांगले स्नेही आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही,”असे सत्तार म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. सत्तार यांनी विखेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता ही ऑफर विखे पाटील स्वीकारणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या नेत्यांचे आज ED विरोधात आंदोलन

Aprna

अहमदनगर महापालिकेत महाविकासआघाडी पॅटर्न ! पुन्हा धक्का, भाजपने गमावली तिसरी मनपा

News Desk

नॉट रिचेबल ! धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी दाखल

News Desk