तिरुवनंतपुरम | “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच आहे,” अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, फक्त फरक ऐवढाच आहे की, आपण गोडसे समर्थक आहोत हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही, असे ते वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टामध्ये काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘संविधान बचाओ’ महारॅलीमध्ये म्हणाले.
#WATCH Rahul Gandhi, Congress in Kalpetta, Kerala: Nathuram Godse & Narendra Modi believe in the same ideology, there is no difference except Narendra Modi does not have the guts to say he believes in Godse. pic.twitter.com/J7GmOlBW55
— ANI (@ANI) January 30, 2020
दरम्यान, “राहुल गांधी म्हणाले की, “आपण भारतीय असल्याचा आपणास अभिमान आहे. आता नरेंद्र मोदी ठरविणार की आपण भारतीय आहोत की नाही. आणि आपण भारतीय असल्याचे सर्टिफिकेट देणारे नरेंद्र मोदी कोण आहेत?,” असे सवाल त्यांनी या सभेत उपस्थित केले.
Rahul Gandhi in Kalpetta: Notice that whenever you ask Narendra Modi about unemployment and jobs, he suddenly distracts attention. NRC and CAA are not going to get jobs, the situation in Kashmir and burning Assam are not going to get jobs for our youth. #Kerala pic.twitter.com/dN7QeMvBZo
— ANI (@ANI) January 30, 2020
“एक लक्षात घ्या की, जेव्हा तुम्ही कधी नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि रोजगारासंदर्भात प्रश्न विचारता, तेव्हा ते तुमचे लक्ष विचलित करतात. नागरिकत्व सुधारणा विधेयक(सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांनी तुमच्यासाठी रोजगार निर्माण होणार नाही. काश्मीरमधील उद्धभलेली परिस्थिती आणि आसाममध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही,” असेही राहुल गांधी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.