कश्मीर | काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या जम्मूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्याला घरी आल्यासारखं वाटत आहे अशी भावनाही व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत गंभीर आरोपही केले आहे.
मी काश्मिरी पंडित आहे
राहुल गांधी या दौऱ्यावर असताना त्यांनी RSS वर टीका केली असून आरोप केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी काश्मिरी पंडित आहे आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित आहे. आज सकाळी काश्मिरी पंडितांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी मला सांगितले की काँग्रेसने त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, पण भाजपने काहीच केले नाही.“मला माझ्या घरी आल्यासारखं वाटत आहे. माझ्या कुटुंबाचे जम्मू -काश्मीरशी दीर्घ संबंध आहेत, ” असे राहुल यांनी शुक्रवारी जम्मूमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आहे.
BJP-RSS is trying to break the composite culture of Jammu and Kashmir: Congress leader Rahul Gandhi addressing party workers in Jammu pic.twitter.com/uV4oKVbV8c
— ANI (@ANI) September 10, 2021
आरएसएस त्या बंधुत्वाचे बंधन तोडण्याचा प्रयत्न करत आहे
“जम्मू -काश्मीरला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे पण मलाही वेदना होत आहेत. जम्मू -काश्मीरमध्ये बंधुभाव आहे पण भाजप आणि आरएसएस त्या बंधुत्वाचे बंधन तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, ” असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. “मी माझ्या काश्मिरी पंडित बांधवांना वचन देतो की मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन,” असे राहुल गांधी म्हणाले. जम्मू -काश्मीरनंतर ते लडाखलाही भेट देतील. त्यानंतर राहुल गांधींनी भाजपवर हल्ला चढवला आणि म्हटले की, पक्षाने जम्मू -काश्मीरला कमकुवत केले आहे. “तुमचे राज्यत्व तुमच्याकडून हिसकावले गेले. जम्मू -काश्मीरला त्याचे राज्यत्व परत मिळायला हवे. ”
१४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले
काँग्रेस नेते राहुल गांधी चक्क पायी वैष्णोदेवीला गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून गुरुवारी ते पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले. काँग्रेसने व्हिडीओ शेअर केला असून यावेळी राहुल गांधी वैष्णोदेवीच्या दिशेने चालताना दिसत आहेत. घामाने भिजलेल्या राहुल गांधी यांच्याभोवती यावेळी सुरक्षारक्षकांचा कडक पहारादेखील होता. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते हातामध्ये पक्षाचा झेंडा घेऊन उभे असल्याचं दिसत आहे.
राहुल गांधी यात्रेवर असताना त्यांनी आपण कोणतंही राजकीय भाष्य करणार नसल्याचं सांगितलं. “मी येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी आलो आहे. मला कोणतंही राजकीय भाष्य करायचं नाहीये,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
पण राजकीय परिस्थिती अशी होती की….
राहुल गांधी यांना गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीला भेट द्यायची होती अशी माहिती काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी दिली आहे. “आम्ही गेल्या तीन वर्षांपासून राहुल गांधींना विचारणा करत होतो. त्यांनाही यायचं होतं, पण राजकीय परिस्थिती अशी होती की ते दौरा करु शकत नव्हते,” अशी माहिती गुलाम अहमद मीर यांनी दिली आहे.
राहुल गांधींची वैष्णोदेवीला पायी चालत जाऊन आरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती असंही त्यांनी सांगितलं. “दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पायी चालत खाली उतरणार आहेत. त्यांची वैष्णोदेवीवर भक्ती आहे, यामुळेच आम्ही दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कोणताही राजकीय कार्यक्रम ठेवला नाही,” अशी माहितीही त्यांनी दिली
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.