नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या लसीकरण संदर्भात केंद्र सरकारवर वारंवार टीका करताना पहायला मिळाले आहेत. त्यांनी आज (१६ जून) त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून पुन्हा एक ट्विट केलंय कोविशिल्डच्या च्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस मधील अंतर वाढवल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारने शास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढवले आहे. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, ” पंतप्रधान मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत कोरोनाव्हायरसचा आधार घेतय आणि जनतेचा जीव घेत आहे देशातील लसीकरण पूर्ण करावे लागेल केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे लशीची कमतरता लपवण्यासाठी भाजपाने रोज खोट बोलणं आणि पोकळ घोषणा देण्याने काही होणार नाही देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे.
देश को तुरंत व पूर्ण टीकाकरण चाहिए- मोदी सरकार की निष्क्रियता से हुई वैक्सीन की कमी को छुपाने के लिए भाजपा के रोज़ के झूठ और खोखले नारे नहीं!
PM की झूठी छवि बचाने के लिए केंद्र सरकार की लगातार कोशिशें वायरस को बढ़ावा दे रही हैं और जनता की जान ले रही हैं। pic.twitter.com/zE0XbNgVca
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 16, 2021
तर देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. या लसीकरण यावरून राहुल गांधी सतत मोदी सरकारवर टीका करत असतात.नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनाझेशनच्या (एन टी ए जी आय) शिफारशीनुसार कोविशिल्डच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलय. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल सर्वेक्षण आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलंय मात्र अशा प्रकारची शिफारस करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं (एन टी ए जी आय)च्या पॅनल मधील 14 पैकी तीन सदस्यांनी सांगितल आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.