HW News Marathi
Covid-19

येत्या खरीप हंगामासाठी ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय

सांगली | राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात ३मेपर्यंत लॉकडाऊन आहे. शेती आणि जीवनावश्यक वस्तू वगळात इतर सर्व उद्योगधंदे बंद आहेत. शेतीविषय कामा लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आली आहे. राज्यात या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महाविकास आघाडी राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली.

या बैठकीत राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. धैर्यशील माने, आ. अनिलजी बाबर, आ. मानसिंगभाऊ नाईक, आ.विक्रम सावंत, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. येत्या खरीप हंगामासाठी पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • गेल्या हंगामात सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे पर्याप्त बिजे उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
  • जूनच्या पहिल्या आठवड्यात खतं व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी नियोजन करावे तसेच सेंद्रीय शेती, शाश्वत शेती याबाबत माहिती देण्यासाठी कृषी विस्तार कार्यक्रम आखण्यात यावा असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
  • जिल्ह्यातील मातीचे परीक्षण करून त्या नमुन्यांच्या आधारे खतं पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पिकविमा योजनांमध्ये तसेच दुष्काळी भागात फळपिक लागवड योजनांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाईल.
  • ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक तरतूद मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहोत. सुक्ष्म सिंचन प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा तसेच प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत अशाही सुचना दिल्या.
  • ताकारी, म्हैसाळ, टेंभू यांसारख्या प्रकल्पांद्वारे पावसाच्या वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून दुष्काळी पट्ट्यातील पाझर तलाव भरण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले.
  • प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी प्रस्तावांसाठी वीज जोडणीचे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावे. ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीसाठी एमआयएस रिपोर्ट तयार करावा यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Omicron Variant : कर्नाटकात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता सर्व दुकाने १७ मेपर्यंत बंद

News Desk

अमेरिकेत कोरोनाचे ९ लाख ५४ हजार १८२ रुग्ण आढळले, तर वुहानमधील सर्व रुग्णांना रुग्णालयामधून डिस्चार्ज

News Desk