HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधी प्रचार करणार नाही ?

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश मिळाले. काँग्रेसच्या अपयशाची जबाबादारी घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. सध्या देशात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र, राहुल गांधी दोन्ही राज्यातील प्रचार करणार नसून राहुल गांधी परदेशात गेले आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्टार प्रचारकांच्या यादी राहुल गांधी नाव आहे. परंतु राहुल गांधी प्रचार करणार नाही. येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र राज्य अत्यंत महत्त्वाचे असताना ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार न केल्याने पक्षाला मोठे नुकसान होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

राहुल गांधी काल (५ ऑक्टोबर) बँकॉकला गेल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागल्या आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग राहुल गांधी ट्रेंडिंग होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आयटी सेलचे मुख्य अमित मालवीय यांनी ट्विट करत टीका केली की का तुम्हाला पण आश्चर्य वाटले का की बँकॉक ट्रेंडिंगमध्ये का आहे. मुंबई माजी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षात लोकशाहीची कमी असल्याचे सांगत काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याची घोषणा केली. तर हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंरग यांनी तिकीट वाटपावर आक्षेप घेत पक्षाचा राजीनामा दिला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या”- मुख्यमंत्री

Aprna

भरधाव दुचाकी सिमेंटपाइपमध्ये घुसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

News Desk

२१ ऑगस्टपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Gauri Tilekar