HW News Marathi
महाराष्ट्र

भरधाव दुचाकी सिमेंटपाइपमध्ये घुसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

कोल्हापूर- महापालिकेने रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या सिमेंटच्या पाइपमध्ये भरधाव दुचाकी घुसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरात घडली. तेजस महादेव घाटगे (वय 32), योगेश महादेव घाटगे (वय 28, दोघेही रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल) अशी मयत झालेल्या दुर्दैवी भावांची नावे आहेत. अपघातात ठार झालेल्या दोन भावांपैकी तेजस हा गोकुळ शिरगाव येथील एमआयडीसीमध्ये नोकरीला होता. तर योगेश हा बांधकामावर सेंट्रींगचे काम करायचा. योगेश आज कोल्हापूरात सेंट्रींगचे मिळणारे काम पाहण्यासाठी आला होता. त्यालागावाकडे घेवून जाण्यासाठी तेजस दुचाकी घेवून आला होता. हे दोघे भाऊ त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत असताना खानविलकर पेट्रोलपंपाशेजारील असणा-या मोठ्या सिमेंट पाईपमध्ये त्यांची दुचाकी शिरली. गाडीच्या वेगाने ते दोघेही पाईपमध्ये दुचाकीसह फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने बराच वेळा वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च, सर्वोच्च न्यायालयसह निवडणूक आयोगाकडून काही अपेक्षा नाही !

News Desk

नरेंद्र मोदीनींच अब्दुल कलमांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटलांचा अजब दावा

News Desk

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

News Desk