पुणे। ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
येलो अर्ट जारी करण्यात आला
आज राज्यात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं पाऊस कोसळणार आहे. मागील जवळपास तीन आठवड्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
Good News for Farmers in Maharashtra
16 Aug, IMD मुंबई व नागपूर द्वारा जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार,राज्यात पुढचेे ३ दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता.खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता
अधिक माहिती साठी IMDची वेबसाइट कृपया पहा pic.twitter.com/5a4hk6rp1L— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.