HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभर पावसाचा कहर, नद्यांना पूर, धरणे फुल्ल..

मुंबई- राज्यातील बहुतांश भागात गेल्या 24 तासांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई व परिसरात 24 तासांपासून धो-धो पाऊस पडत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रभर तसेच मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. अनेक घरांत पाणी शिरले, सखल भाग पाण्याने गच्च भरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची बॅटिंग सुरू आहे. दरम्यानपालघरमध्येही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धामणी धरण फुल्ल झाले आहे. धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे धरणातून जवळपास 14 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येतो आहे. यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे. तिकडे मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील बहाद्दूर शेख पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ही वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबईतील पावसाने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पटरीवर पाणी साचले आहे. पावसामुळे मंगळवारी अनेकांना कामावर जाणे शक्य झाले नाही. अनेकांनी या पावासची तुलना 26 जुलैच्या त्या पावसासोबत केली आहे.

नाशिकमध्ये गोदावरीला महापूर

नाशिकच्या गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. रामकुंडांसह गोदाकाठ पाण्याखाली गेला असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला असून त्यामुळं गोदावरी, दारणा, वालदेवी,नासर्डी आदी नद्यांनाही पूर आला आहे.

मराठवाड्यात देखीव पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे, अनेक नद्यांना पूर आला आहे. बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर कपिलधार धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार राजकारणातले भीष्म पितामह!

News Desk

विरोधकांनी एखादी माहिती मागितली की सरकार म्हणते, ‘नो डेटा ऍव्हेलेबल –  सामना

News Desk

माझ्या राजीनाम्याच्या केवळ पुड्या सोडल्या!

News Desk