HW News Marathi
महाराष्ट्र

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…!

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोर अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अश्लील चित्रफीत निर्मिती प्रकरणात दररोज नवीन खुलासे होऊ लागले आहेत. त्यात अजून भर म्हणजे पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला न्‍यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

राज कुंद्राला पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती. याची मुदत आज मंगळवारी (२७ जुलै ) रोजी संपली होती. यानंतर राजला किला न्यायालयात हजर करण्यात आले.

शिल्पा शेट्टीने एका निवेदनात पुर्वी म्हटले होते की, माझा पती राज कुंद्रा हा निरपराध आहे. हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत पण अश्लील नाहीत असा दावा शिल्पा शेट्टी हिने एका निवेदनात केला होता.

राज कुंद्राला कथित पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली असून न्यायालयाने राजचे आयटी प्रमूख रयान थ्रोपसह त्याची पोलीस कोठडी २७ जुलैपर्यंत होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. राज कुंद्राला आणखी काही काळ चौकशी करण्यासाठी किला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. याआधी राज कुंद्राच्या कोठडीत ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. राज व्यतिरिक्त आणखीही काही जणांची पोलिस चौकशी करत आहेत. या दरम्यान राज यांना न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारत बंद’ हा कोणताही राजकीय बंद नाही – संजय राऊत

News Desk

शिवसेना-भाजप युतीवरून चंद्रकांत खैरेंचा अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर

Aprna

शिवसेना , काँगेस, राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, संभाजीराजेंसोबत जायला तयार – प्रकाश आंबेडकर

News Desk