HW News Marathi
महाराष्ट्र

“अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत”, राज ठाकरे आक्रमक

मुंबई | राज्यात आज(३१ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मात्र राज्य सरकारने दहीहंडी साजरा करू नये असं सरकारने बजावलं आहे, परंतु मनसे कार्यकर्त्यांनी हे नियम झुगारून हंड्या फोल्डया आहेत. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही

राज ठाकरे यांनी सरकारला टोलाही लगावला आहे. “अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरु आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस होऊदे, आम्ही बैठक घेऊन मंदिराची भूमिका घेऊ, मंदिराबाहेर घंटानाद करु. नियम सर्वांसाठी एक लावा, वेगवेगळे नको”, असं ते म्हणाले आहेत.

आम्ही दहीहंडी करायची नाही का?

“सर्व काही सुरु आहे. नारायण राणेंबाबतीत झालं, हाणामाऱ्या झाल्या, भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला, यांच्यासाठी सगळं सुरु, फुटबॉल, क्रिकेट सुरु आहे, आम्ही दहीहंडी करायची नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. राज ठाकरे म्हणाले, “बाहेर पडायला यांची फाटते, त्यात आमचा काय दोष? हे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे.”

बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले

मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांकडून कारवाई

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेने लक्ष्मी पार्क, वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. गोविंदांनी कोरोनाचे निर्बंध झुगारत ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही दहीहंडी फोडली. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी पूजाअर्चा करत मनसेच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली.

यावेळी पोलिसांनी मज्जाव केला होता. मात्र रितीरिवाजाप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देतच दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली. मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे पोलिसांना दहीहंडी शांततेत साजरी करू द्यावी म्हणून विनवणी करत होते. मात्र, पोलिसांनी घोषणा देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या परिसरात मोठा जमाव जमला होता. या कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐनवेळी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकरांना भाजपकडून नोटीस

News Desk

शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादीचा परिवार संवाद दौरा रद्द!

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची नियमानुसार कारवाई होणार – अनिल देशमुख

News Desk