HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे घराणं पुन्हा आमने सामने, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहेत आणि त्यासाठी सगळेच पक्ष तयार आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला ठाकरे सरकार पुन्हा आमने सामने दिसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. मनसे उपाध्यक्ष संजय जामदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसे आक्रमक होताना दिसत आहेत.

आदित्य ठाकरेंच्या विधानसभेत बदल

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्वाचे बदल केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभेची धुरा संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर फेरबदल केल्यानंतर माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे.

नेमके कोण आहेत संजय जामदार ?

संजय जामदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली होती .मनसेच्या वीज बिल आंदोलनावेळी हिरीरीने सहभाग घेतला होता.

आदित्य ठाकरे 2019 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिथे आघाडीतर्फे राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता, मात्र मनसेने ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नव्हता. याविषयी निवडणूक काळातच राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna

ED कडून खडसेंनी तब्बल 9 तास चौकशी ! बाहेर पडल्यावर काय दिली प्रतिक्रिया ?

News Desk

समीर वानखेडे प्रकरणात NIAची एन्ट्री, वानखेडेंच्या चौकशीसाठी NIA टीम NCB कार्यालयात दाखल

News Desk