HW News Marathi
महाराष्ट्र

अकरावीच्या रखडलेल्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी राज ठाकरेंचा वर्षा गायकवाडांना फोन

मुंबई | अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर कोचिंग क्लासच्या शिष्टमंडळाने आणि पालकांनी आज (२ नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भे घेतली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, यावर राज ठाकरेंशी चर्चा केली.

तर काही पालकांनी फी वाढीचा देखील मुद्दा मांडला. राज्य सरकारच्या जीआर नंतरही काही शाळांनी फी वाढ केलीय, असे त्यांचे म्हणणे होते. कोचिंग क्लासेस सुरु करावेत, या मागणीसाठी आज कोचिंग क्लासेसचे मालकही राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. एकूणच समाजातील वेगवेगळया घटकांनी उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची परवागनी मिळावी, यासाठी मागच्या काही महिन्यात राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

दरम्यान, राज्यातील अकरावी प्रवेशाचा रखडलेला प्रश्न उद्यापर्यंत सुटण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी थेट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला असता आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं त्यांनी राज यांना सांगितलं. त्यामुळे हा प्रश्न उद्यापर्यंत मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यानंतर थेट पालकांसमोरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावून अकरावी प्रवेशाची समस्या मांडली. यावेळी आज संध्याकाळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा आज संध्याकाळी होणार आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला त्याबाबतची माहिती देते, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यावर राज यांनी अकरावी प्रवेशाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असं गायकवाड यांना सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज कोल्हापुरात वाहतुकीसाठी ‘कोणते’ मार्ग सुरू होणार

News Desk

भाजपच्या मराठी प्रेमाविषयी प्रशनचिन्ह,बेळगांव निवडणुकीवर राऊतांनी खडसावलं !

News Desk

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचा ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकला

News Desk