HW News Marathi
महाराष्ट्र

“तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष”, राज ठाकरेंची जहरी टीका

मुंबई | राज्यसरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता निर्बंध लावले आहेत, या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज(३१ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का?

राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा झाली, त्यानंतर निदर्शने झाली. नुकताच भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला. मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

स्टुलावर उभं राहून फोडायची का?

राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले आहेत.

राज्य सरकारने दहीहंडी साजरा करू नये असं सरकारने बजावलं आहे, परंतु मनसे कार्यकर्त्यांनी हे नियम झुगारून हंड्या फोल्डया आहेत. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दुष्काळ आवडे सर्वांना

गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट आणली जात आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असं ते म्हणाले आहेत.

लाट यायला हा काय समुद्र आहे का?

राज ठाकरे यांनी निवडणुकांवरूनही राज्यसरकारला टोला लगावला आहे. लाट यायला हा काय समुद्र आहे का? काही जाणवतं का तुम्हाला? उगाच इमारती सील करायच्या. अमेरिकेचं अमेरिका बघेल. तुमच्याकडे नाही ना. आता सर्वांना बंदी करून ठेवायचं आणिहे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही

राज ठाकरे यांनी सरकारला टोलाही लगावला आहे. “अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरु आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस होऊदे, आम्ही बैठक घेऊन मंदिराची भूमिका घेऊ, मंदिराबाहेर घंटानाद करु. नियम सर्वांसाठी एक लावा, वेगवेगळे नको”, असं ते म्हणाले आहेत.

आम्ही दहीहंडी करायची नाही का?

“सर्व काही सुरु आहे. नारायण राणेंबाबतीत झालं, हाणामाऱ्या झाल्या, भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला, यांच्यासाठी सगळं सुरु, फुटबॉल, क्रिकेट सुरु आहे, आम्ही दहीहंडी करायची नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. राज ठाकरे म्हणाले, “बाहेर पडायला यांची फाटते, त्यात आमचा काय दोष? हे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे.”

बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले

मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, उद्या ‘हे’ मंत्री घेणार शपथ

News Desk

“शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी जे सांगितलं, ते आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं!”

News Desk

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk