HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीतील ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय हालचालींना सुरूवात

मुंबई | महाविकासआघाडी मध्ये असलेल्या पक्षांमध्ये सध्या कुरघोडी सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहेत असं दिसून येतं. एकीकडे काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक घटकपक्षही नाराज असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारला या घटक पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याने सरकारनं विधानसभेत मजबूत बहुमत सिद्ध केले होते.

साकारचं पक्षाकडे दुर्लक्ष

महाविकासआघाडी मध्ये सुरु असलेल्या तणावाचं प्रक्षेपण आता लोकांपुढे येत आहेत. सरकारला बहुमतांनी विजयी करून देण्यासाठी एका घटकाने खूप मदत केली होती.याच घटकाकडे आता सरकारचं दुर्लक्ष आहे असा आरोप आहे. सरकार या घटक पक्षांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या पक्षांची पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक सुरू केली आहे. शेकापच्या प्रदेश कार्यालयात या पक्षांची बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप या पक्षांनी केला आहे. घटकपक्षांच्या ८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र आम्हाला वारंवार डावलण्यात येत आहे अशी भावना घटकपक्षांमध्ये तयार झाली आहे.

मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी पुढे वाढण्याची चिन्हं आतापासूनच दिसत आहेत. हे सरकार त्यांच्या भांडणामुळेच पडणार आहे असं वारंवार विरोधी पक्ष भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारमधील अनेक नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि इतर डाव्या पक्षांचे नेते उपस्थित आहेत. महाविकास आघाडीनं लक्ष न दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याचं सांगितले जात आहे. यापुढे काय निर्णय होईल हे पाहणं गरजेचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचे खत चांगले आहे, महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार !

News Desk

भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली त्यामुळे भाजपने तात्काळ माफी मागावी – सचिन सावंत

News Desk

कपड्यांवरील GST वाढवण्याचा निर्णय मागे; जीएसटी परिषदेमध्ये घेतला निर्णय

Aprna