HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या आजच्या बैठकीत राज ठाकरेंची सुनही उपस्थित

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची आज (२९ जानेवारी) दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत. वांद्रे इथल्या MIG क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे उपस्थित आहेत. मात्र यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली ठाकरे यांनी.

अमित आणि मिताली हे दाम्पत्यही मनसेच्या आजच्या बैठकीला उपस्थित आहे. राज्यातील मनसेचे नेते , सरचिटणीस , प्रमुख शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर इथे चर्चा होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर , अविनाश अभयंकर, गजानन काळे, विविध नेते उपस्थित आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून विशेष समिती तयार करण्यात येणार आहे. या समितीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेसोबत चंद्रकांत पाटील यांची अर्धातास बंद दाराआड चर्चा

News Desk

झिशान सिद्दीकींच्या तक्रारीवर भाई जगताप म्हणतात, त्याचं जेव्हढं वय, त्यापेक्षा जास्त माझी कारकीर्द!

News Desk

‘CBI’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk