HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्र्यांना विधान भवनात राज ठाकरे भेटणार होते पण ‘या’ कारणाने भेट टळली 

मुंबई | कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातल्यापासून सरकारने वारंवार मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे या उपाययोजना पाळायल्या सांगितल्या आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच कधीच मास्क घातला नाही. त्यांच्या याच मास्क न घालण्याच्या सवयीने त्यांना विधान भवनात येता आले नाही. ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. पण राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड १९ संसर्ग RTPCR चाचणी करणं आवश्यक होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आधीच मास्क घालत नव्हते. त्यामुळे विधान भवनात प्रवेश करणार्या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आलेत त्यांचं पालन राज ठाकरे करणार होते का..? हा देखील प्रश्नं विधान भवनात चर्चेत होता. पण अखेर RTPCR चाचणी केली नसल्यामुळे राज ठाकरे विधान भवनात आलेच नाहीत.राज ठाकरे हे वीजबिल आणि अन्य प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार होते अशी माहिती आहे. त्यासाठी ते मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. मात्र मंत्रालयात विनामास्क आणि विना RTPCR चाचणी प्रवेश नाही याची त्यांना माहिती मिळाली.

राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत असं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची कुणकुण लागल्याने राज ठाकरे माघारी फिरल्याचं सांगण्यात येत आहे.यापूर्वी राज ठाकरे मास्कबाबत काय म्हणाले होते? मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. परंतु त्यावेळी ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले होते.

‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं.महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांमध्ये चर्चा नक्कीच रंगते.

Related posts

सिडकोच्या घरांसाठी बम्पर लॉटरी जाहीर

अपर्णा गोतपागर

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही | सर्वोच्च न्यायालय

News Desk

काँग्रेस अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरु

News Desk