HW News Marathi
Covid-19

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून पत्र लिहित सांत्वन

मुंबई | कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक पत्र पाठवून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती दाखवलेल्या आपुलकीचं पक्षामध्ये आणि पदाधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.

परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा

आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो

आपला नम्र

राज ठाकरे

नांदेडमधील पदाधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. यामुळे खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अस्वस्थ झाले होते. राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्यांचे बंधू अनिल यांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी अनिल ईरावर यांचे फोनवरुन सांत्वन केले. काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन, काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

News Desk

“तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी चिंता का?” आदित्य ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

News Desk

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही दिशाभूल केल्यास कारवाई करणार

News Desk