HW News Marathi
Covid-19

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे.

 

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा, कोरोनास्थितीचा घेणार आढावा

News Desk

पुणेकरांनो थोडी कळ सोसा, वडेट्टीवारांचा सल्ला!

News Desk

कोरोनाची औषधं आणि लसीवर GST कर गरजेचा, नाहीतर किंमत वाढेल- निर्मला सीतारामन

News Desk