HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा भाऊबीजच्या मुहूर्तावर शिवतीर्थ प्रवेश

मुंबई। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाऊबिजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. राज ठाकरेंच्या नव्या घराचे नाव हे शिवतीर्थ आहे. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरे यांनी नव्या इमारतीत आज शनिवारी सहकुटूंब प्रवेश केला. अमित ठाकरे यांच्या हस्ते घराची पूजा सुरू झाली. बहुमजली अशा शिवतीर्थ इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर विशिष्ट अशी रचना केली आहे. पाच मजली इमारतीत राज ठाकरे कुटूंबाचा आज गृहप्रवेश आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झलक यानिमित्ताने कार्यकर्त्यांना पहायला मिळाली. राज ठाकरे हे गेल्या अनेक दशकांपासून कृष्णकुंजवर राहत आहेत. पण राजकारणात शिवतीर्थाच्या निमित्ताने एका नवा अध्यायाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या इमारतीच्या बांधकामाला अतिशय वेग आला होता. अखेर राज ठाकरे कुटूंबीयांनी भाऊबिजेच्या निमित्ताने आज गृहप्रवेश केला.

कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठीचा आता नवा पत्ता

कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंची ही नवीन पाचमजली इमारत आहे. या इमारतीमध्ये वाचनालय, कॉन्फरन्स रूम, कार्यालयीन कक्ष अशी सुरूवातीच्या दोन मजल्यावरील व्यवस्था आहे. तिसऱ्या मजल्यावर राज ठाकरे हे आपल्या कुटूंबीयांसोबत राहणार आहेत. पाश्चिमात्य पद्धतीची ही संपुर्ण इमारतीची रचना आहे. मनसेचे कार्यालयदेखील याच इमारतीमध्ये असणार आहे. त्यामुळे पक्षाच्या बैठकांची व्यवस्था तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठीचा आता नवा पत्ता हा शिवतिर्थ असणार आहे.

राजगड नव्हे शिवतीर्थ

मनसेच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी आणि बैठकांसाठीचा याआधीचा मनसे मुख्यालयाचा पत्ता हा राजगड होता. पण हा पत्ता आता बदलणार आहे. मनसेच्या मुख्यालयाची नवीन ओळख आता राज ठाकरेंचे नवे निवासस्थान शिवतीर्थ असणार आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात राजगड एवजी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ही शिवतीर्थासमोर असणार यात शंका नाही. आजही भाऊबिजेच्या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवतिर्थासमोर कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसून आले. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राज ठाकरेंची एक झलक याठिकाणी शिवतीर्थावर पहायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil

मोदी सरकारविरुध्द काँग्रेसचा अतिविराट मोर्चा

News Desk

“… म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला”, कारण सांगताना माजी आमदाराच्या डोळ्यात पाणी

News Desk