HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज ठाकरे अद्यापही औरंगाबादमध्येच, कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेणार

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत पण आता अचानक मराठवाड्याचा हा दौरा अर्धवट ठेवत ते आज तातडीने मुंबईत परतणार होते. परंतू औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांसोबत आज त्यांचा मेळावा असल्याकारणाने राज ठाकरे अजूनही औरंगाबादमध्येच आहेत. काल (१४ फेब्रुवारी) त्यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका पार पाडल्या तसेच पत्रकारांशी औपचारिक संवादही साधला.

मनसेच्या नव्या झेंड्याचे जेव्हापासून अनावरण झाले आहे तेव्हापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली शिवाय गुलाबराव पाटील यांनीही मनसेला शिवसेनेचं उष्ट खाण्याची सवयच लागली आहे असे म्हणत मनसेवर निशाणा साधला होता.

पुलवामा जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव…

पत्रकारांशी औपचारिक मारलेल्या गप्पांमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला असता, जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गाने घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आले होते. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘मला वाटते जे घडायचं होते, ते घडले. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार आले. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केले.

Related posts

आईच्या हत्या प्रकरणी मुलाला जोधपूर येथूनअटक

News Desk

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

News Desk

जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे पाच नगरसेवक येणार अडचणीत

News Desk