HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता राज ठाकरे मैदानात; राज्य सरकारशी चर्चा करणार

मुंबई। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरे राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती मनसे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी दिली. एसटीचं शासनात विलनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला असून ठिकठिकाणी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज राज ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेत मदतीची मागणी केली.

या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची आणि राज ठाकरे यांची भूमिका मांडली. राज ठाकरे सरकारशी एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर बोलणार आहेत. तातडीने यावर ते चर्चा करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे स्वत: मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. एकदा सरकारशी चर्चा झाल्यावर कामगारांशी काय बोलायचं ते राज ठाकरे बोलणार आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

मनसे एसटी कर्मचाऱ्यांसोबत

आमचे वकील त्यांच्यासोबत कायम आहेत. यापुढेही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत पक्ष असणारच सोबत आमचे वकील देखील सोबत असणार आहेत. कायदेशीर लढाई सुरु आहे ते लढतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं.२८ संघटनांनी मिळून हा संप जाहीर केला आहे. १ लाख कर्मचाऱ्यांनी सर्व संघटना बाजूला ठेवून संघटनाविरहीत ते त्यांचा लढा आहेत, असं त्यांनी सांगितलं राज ठाकरेंना सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्यांपैकी महत्त्वाची मागणी म्हणजे एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १२ आठवड्यांची मुदत दिली आहे. तसंच, समिती गठित केली आहे. ही सगळी माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिल्याचं नांदगावकर म्हणाले.

त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर काय करायचं असं त्यांना आम्ही विचारलं. त्यावर त्यांनी राज्य सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन दिलं जातं तसं जर दिलं तर ते पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल ठरेल, असं त्यांनी आम्हाला सांगितल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

News Desk