HW News Marathi
महाराष्ट्र

पवार-फडणवीस भेटीवर राज ठाकरे म्हणतात….

मुंबई | विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. तिथे रक्षा खडसेंची त्यांनी भेट घेतली. दरम्यान, रक्षा खडसेंनी एबीपी माझ्या दिलेल्या माहितीत त्या असं म्हणाल्या की, देवेंद्र फड़णवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात बातचीत झाली. या नंतर राजकीय वर्तृळात आणखी चर्चा सुरु झाली. या सगळ्या मुद्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. ‘बिटविन द लाइन्स’ मध्ये या भेटीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

कळतच नाही कोण कोणाचा शत्रु आहे ते

“इतकी भांबावलेली राजकीय परिस्थिती मी इतक्या वर्षात कधीच पाहिली नाही. मी असं वातावरणच कधी पाहिलं नाही. या संपूर्ण देशामध्ये मला कळतच नाही की कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कुणाचा राजकीय मित्र आहे. यांच वाजलंच आहे, असं एकवेळ आपल्याला असं वाटायला लागतं आणि दोन दिवसांनी कळत दोघंही एकमेकांना भेटले आणि दोघांनी एकमेकांशी चर्चा केली,” असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी भेटींचा वाचला पाढा

“महाराष्ट्रातील सरकार आपण बघितलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद हवं म्हणून ते राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर गेले. मग वाटलं की, भाजपा आणि यांचं वाजलं. मध्येच नरेंद्र मोदी आणि त्यांचं बोलणं होतं. आणि ते वेगळ्याच विषयांवर होतं. तब्येत चांगली आहे ना. घरंच सगळं व्यवस्थित आहे ना… बाकी काय सुरू आहे… अशी होते. यात राजकीय मतभेद बाजूला सारून वैयक्तिक मतभेद नसतात हे मानलं तर… आता परवा फडणवीस शरद पवारांना भेटून आले. मग शरद पवार अहमदाबादला अमित शाह यांना भेटून आले. मग अजून कुणीतरी कुणाला भेटलं. मला समजतचं नाहीये. २०१४ पूर्वीपर्यंत एक विरोधी पक्ष आणि एक सत्ताधारी पक्ष असं होतं. आता या क्षणी बघितलं, तर ममता बॅनर्जी हा एक पक्ष आणि भाजपा विरोधी पक्ष…”, असं राज ठाकरे म्हणाले.

“लोकांना दोन ओळींमधलं वाचता आलं पाहिजे” – राज ठाकरे

“मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचं असेल, तर हा विकास हवा कशाला. समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ आहे. बाळासाहेब व्यंगचित्रकाराबद्दल नेहमी एक वाक्य सांगायचे की, व्यंगचित्रकार हा व्यंगचित्रकार का असतो, कारण तो नेहमी दोन ओळींच्या मधलं वाचतो. सुशिक्षित सुज्ञ समाजाला वर्तमानपत्रांच्या किंवा चॅनेलवरील बातमीच्या दोन ओळींमधील वाचता आलं पाहिजे” असं मतही राज ठाकरे यांनी मांडलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिजीधन मेळाव्यातील लोकराज्यच्या दालनास खोतकर यांनी भेट दिली

News Desk

ईडीच्या कार्यालयासमोरआरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही  

News Desk

भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई;सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

News Desk