HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे, प्रवीण गायकवाड समर्थकांमध्ये पुन्हा उत्तर प्रत्युत्तर मालिका सुरूच..!

पुणे। राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरे समर्थकांनी गायकवाड यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गायकवाड आणि राज समर्थक समोरासमोर भिडले आहेत.

गायकवाड समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात प्रवीण गायकवाडांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गायकवाड समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. राज ठाकरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा खोटा इतिहास वाचवण्याचं काम करत आहेत. पुणे ही कोणाच्या बापाची जहाँगिरदारी नाही. आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार आहोत. मग ते राज ठाकरे असो किंवा कोणीही. इतिहासावरील चर्चेला चर्चेनं, गुद्द्याला गुद्द्यानं उत्तर देऊ, असा इशारा समर्थकांनी मनसेला दिला आहे.

त्यांनी त्यावेळी 13 जागा जिंकता आल्या पण आता काय परिस्थिती आहे

या वादात आता श्रीमंत कोकाटे यांनीही उडी घेतली आहे. मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुणाच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असा जोरदार हल्ला श्रीमंत कोकाटे यांनी चढवला आहे. राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी 13 जागा जिंकता आल्या. पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

वसंत मोरे यांनी दिला होता इशारा

प्रवीण गायकवाड यांनी केलेली टीका मनसेला चांगली झोंबल्याचं पाहायला मिळालं. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे. वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा देतानाच 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे भोसलेंचे भाजपत योगदान किती?, संजय काकडेंचा सवाल

swarit

ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना,छोट्याश्या मुलीची सुप्रियाताई सुळेंना आर्त हाक

swarit

अशा चौकशा लावून विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला तर…

News Desk