HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे आज होणार न्यायालयात हजर, नवी मुंबईत मनसेची ‘पोस्टरबाजी’

नवी मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी २०१४ साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, वारंवार समन्स पाठवूनही उपस्थित न राहिल्याने अखेर बेलापूर न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात वॉरंट काढले होते. याच पार्श्वभूमीवर, आज (६ फेब्रुवारी) राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे येणार म्हणून मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शहरात मोठी बॅनरबाजी केली आहे. त्याचप्रमाणे, राज ठाकरे न्यायालयात हजर राहतील त्यावेळी मनसेचे तब्बल ४ ते ५ हजार कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जाते.

काय आहे प्रकरण ?

राज ठाकरे यांनी २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये टोलनाक्यांबाबत केलेल्या भडकाऊ भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. याप्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे, आज राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार आहेत.
दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक असल्याने मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठी संधी चालून आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचा विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय

Aprna

#MaharashtraResult2019 Live Update : मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून विजयी

News Desk

“राज ठाकरे यांच्या मताशी सहमत!”, प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना पाठिंबा

News Desk