HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही, राज ठाकरेंचा टोला

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (११ जुलै) पुण्यात आले होते. त्यांनी मीडियाशी संवादही साधला. यावेळी त्यांना राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी आहात का?, असा सवाल केला गेला. त्यावर राज्य सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही, असा मार्मिक टोला राज यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी आहात का?, असा सवाल त्यांना यावेळी केला गेला. त्यावर, या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात सरकारचा कारभार मूळात अजून बघायला मिळाला नाही. त्यामुळे कशावर व्यक्त करायचं?, असा सवाल राज यांनी केला आहे.

ईडीचा गैरवापर नक्कीच होतोय

ईडीचा गैरवापर होत आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले. यंत्रणांचा गैरवापर होत आहे. काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता. भाजपचं सरकार असतानाही होत आहे. यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

निवडणुकीची रणनीती तुम्हाला का सांगू?

यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलं. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत सल्ला देण्याचा अधिकारच नाही !

News Desk

ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येणार 

News Desk

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

News Desk