HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

मुंबई | राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (१२ जानेवारी) मनसेची महत्त्वाची बैठक होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. बांद्राच्या MIG क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसे जोरदार कमबॅक करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या भाषणाचा विपर्यास झाला! प्रसाद लाड यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

‘पोलीस कार्यालयात ५०% हजेरी, इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

News Desk

…हेगडेंना मी प्रताप सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले, रेणू शर्माचा गौप्यस्फोट!

News Desk