HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे ‘या’ कारणासाठी शरद पवारांना भेटणार

मुंबई | मनसे नेते जमील शेख हत्या प्रकरणावर मनसे पक्षप्मुख राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज (६ एप्रिल) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी माणसं दिवसाढवळ्या खून करत असल्याचा आरोप केला, तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचं नावही त्यांनी या प्रकरणात घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी मनसेचे पदाधिकारी जमीर शेख यांची हत्या झाली होती. यावर राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव पुढे आलं आहे. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असतील तर हे बरोबर नाही.

या प्रकरणात सरकार काय करतं ते पाहणार आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य नाही. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला आणि आरोपींना अटक केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी हे कबुल केल्याचं देखील समोर आलं आहे. याआधी नजीम मुल्ला यांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात देखील चर्चेत आलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांचं नाव पुढे आल्याने राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असा इशारा राज ठाकरेंनी यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचा या प्रेसनोटमध्ये उल्लेख असल्यानं राज ठाकरे चांगलेच खवळले होते. सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करत आहेत. बिल्डर सूरज परमार यांच्या सुसाईड नोटमध्येही याच नजीब मुल्लाचं नाव होतं, मात्र ती केस रफदफा केली गेली. आता या प्रकरणात राज्य सरकार काय करतंय याची मी वाट पाहतोय, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीला अशी मंडळी पक्षात सांभाळायची असतील तर आमचे हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने असं सुरु झालं तर सुसंस्कृत महाराष्ट्रात हे चित्र चांगलं दिसणार नाही. या गोष्टीला वेळीच आवर घाला. नजीम मुल्लाला अटक करुन त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, यासाठी मी लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहे, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक! विखे पाटील

swarit

यशवंत जाधव प्रकरणी आयुक्त इक्बालसिंह चहल आयकर विभागाच्या रडारवर

News Desk

काँग्रेस सावरकरविरोधी नाही !

News Desk