HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींविरोधी मोर्चेबांधणी, राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जींची भेट

मुंबई | लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडाडून विरोध करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पुन्हा विधानसभेविरोध करण्यासाठी मोर्चेबांधणींला सुरुवात केली आहे. राज ठाकरे मोदी आणि ईव्हीएमविरोधात एक वेगळा मोर्चा उभा करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी राज ठाकरे तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी राज ठाकरे आज (३० जुलै) कोलकात्याला रवाना झाले आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आधीच काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी विविध पक्ष व संघटना देशभरात ईव्हीएमविरोधात मोर्चा काढणार आहेत. त्यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते ममतांची भेट घेणार असल्याची माहिती मिळलाी आहे. यापूर्वी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात फक्त एक रूपयांची वाढ

News Desk

हिंगोलीच्या जाधव दांपत्याने केली विठ्ठलाची महापुजा

News Desk

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर !

News Desk