HW News Marathi
Covid-19

‘लसीकरण केंद्रावर खासदार राजन विचारेंकडून कार्यकर्त्याला मारहाण’

ठाणे | कोरोना महामारीशी लढण्यासाठी कोरोनाची लस अत्यंत महत्वाची आहे. लसीकरणाची मोहीम संपूर्ण देशात जोमाने सुरु आहे. अनेक नेते त्यांच्या भागात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं म्हणून लसीकरण केंद्र उभारत आहेत. मात्र ठाण्यात आज (३ जुलै) लसीकरण कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गेटमधून आत शिरण्यासाठी लोकांनी गोंधळ घातला.

खासदार राजन विचारे संतापले

खासदार राजन विचारे यांच्या तर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीपासून स्वत: राजन विचारे या कार्यक्रम स्थळी हजर होते. सुरुवातीला ३०० लोकांचं लसीकरण या कार्यक्रमातून होणार होतं. या कार्यक्रमाला आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लसीकरणासाठी आलेली संख्या पाहता आणखी २०० जणांचं लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं.

या कार्यक्रमातील गर्दीचं नियोजन स्थानिक शिवसैनिक आणि पोलीस प्रशासन करत होते. परंतु गर्दीमुळे गेटवर गोंधळ उडाला आणि गेट बंद करण्यात आले. ओळखीच्या लोकांना आत सोडलं जात असल्याचं आरोप लोकांनी केला. त्यावेळी गेटवरील प्रकार पाहून खासदार राजन विचारे संतापले. त्याठिकाणी उभे असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका मारून ओळखींच्या आत कशाला सोडता? सकाळपासून लोकांनी रांगा लावलेत असं बजावलं.

गुरुवारी लस उपलब्ध नसल्याने सलग तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद

सोमवारी महापालिकेने एकाच दिवशी २२ हजार जणांचे लसीकरण करून विक्रम केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी साठा नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. त्यात मंगळवारी साठा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ICSE बोर्डाच्याही १०वीच्या परीक्षा रद्द!

News Desk

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू

News Desk

पुण्यात मास्क न वापरता फिरताय ? सावधान !

News Desk