HW News Marathi
महाराष्ट्र

“इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा ‘तो’ व्हिडिओ वायरल

बुलडाणा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी गावकऱ्यांना धमकावल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील चांगेफळ येथे हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे या व्हीडिओत राजेंद्र शिंगणे गावकऱ्यांना धमकावताना दिसत आहेत. काही गावकरी त्यांच्याकडे समस्या घेऊन आले होते. तेव्हा राजेंद्र शिंगणे यांना त्या गावकऱ्यांना फैलावर घेतले. मायच्या इमानदारिने बोला , तुम्हाला सरपंचाने पाठविले आहे का माझ्याकडे ?, …मायच्या इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन, असे शिंगणे यांनी म्हटल्याचे व्हीडिओत ऐकायला येत आहे.काय घडले?

चांगेफळ येथील काही नागरिक हे गावांतील मातंग समाजच्या स्मशानभूमी संदर्भात समस्यांचे निवेदन घेऊन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेले होते. या स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. तेव्हा शिंगणे यांनी उद्धतपणाची वागणूक देत तुम्हाला सरपंचाने माझ्याकडे पाठविले का? , मायच्या इमानदारीने बोला, नाहीतर तुम्हाला जेलात टाकीन अशी धमकी दिली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

Aprna

काही तास बाकी वादळापूर्वीची शांतता !

News Desk

एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला !

News Desk