HW News Marathi
Covid-19

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

मुंबई | आईच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने आपण पोरके होतो हे नक्कीच खरे आहे. मात्र, त्याच आईच्या शिकवणीमुळे‍ आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अहोरात्र कोरोनाशी दोन हात करत आहेतच. मात्र, त्यांनी मुलाचे कर्तव्य देखील तितक्याच निष्ठेने आणि जबाबदारीने निभावाले आहे. १ ऑगस्टला आईचा मृत्यू झाल्यानंतर केवळ ३ दिवसांचा दुखवटा करून पुन्हा एकदा राजेश टोपे कोरोना विरुद्धच्या या लढाईला उभे राहिले आहेत.

टोपे कुटुंबियांचे जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहणाऱ्या सर्वांसाठी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मार्चच्या सुरूवातीला जेव्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला सुरूवात झाली नेमक्या त्या कसोटीच्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या आई रुग्णालयात दाखल होत्या. कोरोनाच्या लढ्यात मुख्य कामगिरी करत असलेल्या आरोग्यमंत्र्यांना आईला पुरेसा वेळ देता येत नव्हता तरीही ते वेळात वेळ काढून आईला भेटायला जायचे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

News Desk

Corona World Update : जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ४१ लाखांवर पोहोचली

News Desk

मोठी बातमी ! लस घेण्यासाठी आता कोविनवर रजिस्ट्रेशनची गरज नाही, केंद्राची माहिती

News Desk